बऱ्याचवेळा आपण पाहतो की कलाविश्वात काम करणाऱ्या अभिनेत्रीसाठी तिचा लूक, चेहरा याकडे खूप लक्ष द्याव लागतं. त्यासाठी बऱ्याच अभिनेत्री सर्जरी करतात आणि त्याचा कधी कधी उलटा परिणाम दिसू लागतो. पण यावेळी रुट कॅनलमुळे एका अभिनेत्रीचा चेहरा ओळखता येत नाही आहे. कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशने रुट कॅनल सर्जरी केल्यानंतर तिचा चेहरा ओळखेनासा झाला आहे. स्वातीच्या चेहऱ्याचा उजवा भाग प्रचंड सुजला आहे.

आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट, चर्चांना उधाण

रुट कॅनल केल्यानंतर सूज येते हे अत्यंत सर्वसामान्य साइड इफेक्टस आहेत आणि ती सूज थोड्यावेळात जाते, असं डॉक्टारांनी स्वातीला सर्जरीआधीच सांगितले होते. मात्र २० दिवसांनंतरही स्वातीचा चेहरा सुजलेलाच आहे. कन्नड माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्वातीने संबंधित क्लिनिकवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचाही इशारा दिला आहे. मात्र सर्जरीनंतर आपलाच चेहरा आपल्याला ओळखू येत नसल्याचं दु:ख स्वातीने व्यक्त केलं.

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

चेहऱ्यावरील सूज तशीच राहिल्याने करिअरच्या संधीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वातीचा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र अशा परिस्थितीमुळे ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही बाहेर पडू शकत नसल्याची खंत तिने व्यक्त केली. सध्या ती दुसऱ्या रुग्णालयातून त्यावर उपचार घेत आहे. या प्रकरणावर अद्याप क्लिनिककडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

Story img Loader