दाक्षिणात्या चित्रपटांना हिंदी बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतो हे आपण याआधीही अनुभवलं आहे. ‘पुष्षा’, ‘केजीएफ’ यांच्या पाठोपाठ अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झाला. तर १४ ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. आयएमडीबीवर हा चित्रपट टॉपला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने ‘केजीएफ चॅप्‍टर 2’, ‘आरआरआर’ चित्रपटांना मागे टाकलं आहे.

‘कांतारा’ला आयएमडीबीवर १० पैकी ९.६ रेटिंग मिळाली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. ‘जय भीम’ पाथोपात आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळवणारा हा दूसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला आहे. याबरोबच चित्रपटाने हिंदी भाषेतही चांगलीच कमाई करायला सुरुवात केली आहे.

Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Kaun Banega Crorepati Season 16 Amitabh Bachchan says I neither keep cash nor visit an ATM
KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…

आणखी वाचा : “तू फक्त घराकडे…” आई झाल्यानंतर माधुरीला दिला जायचा हा सल्ला; अभिनेत्रीने मुलाखतीत केला खुलासा

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.२७ कोटीचा गल्ला जमवला. शनिवारी या चित्रपटाच्या कमाईमध्ये १३० ते १४० % ने वाढ झाली आहे. प्रख्यात ट्रेड अभ्यासक तरण आदर्श यांनीदेखील या चित्रपटाची कमाई कमालीची वाढणार ही भविष्यवाणी केली होती. त्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३.५० कोटी इतकी कमाई केली आहे. येत्या काही दिवसात हा चित्रपट आणखीन कमाई करेल, तसेच पुष्पाप्रमाणे ओटीटीवर प्रदर्शित होऊनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘कांतारा’ने बॉलिवूडला चांगलंच झोपवलं आहे. या चित्रपटाबरोबरच आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ आणि परिणीती चोप्रा ‘कोड नेम तिरंगा’ हे दोन बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी जवळपास फक्त १५ लाखांच्या आसपास गल्ला गोळा केल्याची चर्चा होत आहे. पुन्हा एकदा बॉलिवूडच्या चित्रपटावर दाक्षिणात्य चित्रपटाने कुरघोडी केली आहे आणि प्रेक्षकही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहे.

Story img Loader