Kiccha Sudeep Mother Pass Away : ‘स्पार्शी’, ‘हचचा’, ‘कीचा’, ‘स्वथी मुथू’, ‘माय ऑटोग्राफ’, ‘मक्खी’ यांसारख्या अनेक चित्रपटातून दमदार अभिनयाने आणि सध्या ‘बिग बॉस कन्नड’मधील होस्टिंगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या किच्चा सुदीपच्या घरी दुःखद घटना घडली आहे. किच्चा सुदीपची आई सरोज संजीव यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईच्या निधनामुळे किच्चा सुदीपवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कन्नड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आनंद शिंदेंबरोबर झाली अचानक भेट, फोटो शेअर करत म्हणाला, “माझं बालपण…”

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, किच्चा सुदीपच्या डोक्यावरून आज मायेचं छत्र हरपलं आहे. सरोज संजीव यांनी बंगळुरूच्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे किच्चासह त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा – Video: “जय बजरंगबली…”, ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

Kiccha Sudeep Mother Pass Away ( Photo Credit – Facebook )

माहितानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या वयामुळे सरोज यांना आरोग्यासंबंधित समस्या सातत्याने निर्माण होत होत्या. त्यामुळे त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांच्या देखरेखीनंतरही किच्चा याच्या आईची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सरोज संजीव अभिनेत्याच्या खूप जवळ होत्या. त्यामुळे आईच्या निधनाने किच्चा सुदीपला खूप मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते सुदीपचे सांत्वन करत आहेत आणि त्याच्या आईला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: सिद्धार्थ जाधव लवकरच येतोय धिंगाणा घालायला; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

अंत्यसंस्कार कधी होणार?

किच्चा सुदीपच्या आईचं पार्थिव बंगळुरू जेपी नगर येथील अभिनेत्याच्या निवासस्थानी आणले जाणार आहेत. इथेच अभिनेत्याचे जवळचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी सरोज संजीव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर किच्चा सुदीपच्या आईवर अंत्यसंस्कार विल्सन गार्डनमध्ये केलं जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kannada superstar kiccha sudeep mother saroja sanjeev pass away at 86 pps