Kantara 2 First Look: रिषभ शेट्टीचा ‘कंतारा’ हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याच्या कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट हिट झाल्यानंतरच रिषभने त्याच्या पुढच्या भागाची घोषणा केली होती, जो पाहायला गेलं तर या चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे. नुकतंच कर्नाटकातील कुंदापुरा येथील ऐतिहासिक मंदिरात ‘कांतारा चॅप्टर १’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

हा फर्स्ट लुक लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. पहिल्या भागाच्या आधीची गोष्ट या नव्या चित्रपटात उलगडणार असून यामध्येही प्रमुख भूमिकेत रिषभ शेट्टीच दिसणार आहे. फर्स्ट लुकमध्ये पिळदार शरीर, दंडावर कडं, गळ्यात रुद्राक्षाच्या मला, हातात भाला आणि त्या हातावरून वाहणारे रक्ताचे ओघळ असा एकंदर रिषभचा रुद्रावतार या फर्स्ट लुकमध्ये पाहायला मिळत आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
onion crisis in maharashtra loksatta analysis how long shortage of onion remain in india
विश्लेषण : कांद्याचा तुटवडा का आणि किती दिवस?

आणखी वाचा : ‘जवान’च्या दिग्दर्शकावर नयनतारा व विजय सेतुपती यांचे बरेच सीन्स वगळल्याचा आरोप; नेमकं प्रकरण जाणून घ्या

याबरोबरच या फर्स्ट लुकमधले रिषभचे डोळे आणि त्यातील अग्नि हे काहीतरी वेगळंच सांगू पहात आहे. सोशल मीडियावर ‘कांतारा अ लेजेंड -चॅप्टर १’च्या या फर्स्ट लुकची जबरदस्त चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ने बड्याबड्या बॉलिवूड चित्रपटांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं होतं. सुरुवातीला केवळ कन्नडमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची एवढी चर्चा झाली की त्यांना इतरही भाषांमध्ये हा चित्रपट डब करून प्रदर्शित करणं भाग होतं.

१६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कांतारा’ने ४०७.८२ कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळेच पहिल्या भागाप्रमाणेच या दुसऱ्या भागाचीसुद्धा प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. ‘कांतारा अ लेजेंड -चॅप्टर १’ हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू,मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच याचंही दिग्दर्शन रिषभ शेट्टीनेच केलं आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु २०२४ च्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.