सध्या ‘कांतारा’स्टार रिषभ शेट्टीची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कन्नडमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर इतरही भाषांमध्ये तिप्पट कमाई करणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या चित्रपट ठरला आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रिषभ याने त्याचा खास मित्र आणि अभिनेता रक्षित शेट्टी यांचा एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ आणि रक्षित यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला क्लॅप बॉय आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते तेव्हा त्यांची मैत्री झाली. २०१६ मध्ये ऋषभने रिकीसोबत दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यामध्ये रक्षित मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिषभने त्याच्या आणि रक्षितच्या मैत्रीबद्दल खुलासा केला. आमच्या दोघांच्या करियरची सुरुवात काही खास झाली नसली तरी तेव्हापासून आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं रिषभ म्हणाला.

एक काळ असा होता जेव्हा रिषभ आणि रक्षित दोघे लोकांना तिकिटे विकण्यासाठी थिएटरच्या बाहेर उभे राहायचे. ही आठवण सांगताना रिषभ म्हणतो, “आम्ही आमचा चित्रपट दाखवण्यासाठी थिएटरच्या बाहेर उभे राहायचो आणि लोकांना तिकीट देऊन तो पाहण्यासाठी विनंती करायचो. पण लोक आमची तिकीटं केवळ दारूसाठी १० रुपयांना विकत असत. या काळातसुद्धा आम्ही खचलो नाही, मेहनत करत होतो.आता, आमच्या कामाचे लोकांकडून कौतुक होत आहे आणि सर्वजण पाठिंबा देत आहेत.”

आणखी वाचा : सलमान, अक्षय, अनुपम खेर यांच्या सुरक्षेत वाढ; कुणाला मिळाली ‘Y+’ आणि ‘X’ सिक्युरिटी? जाणून घ्या

‘कांतारा’ कन्नडमध्ये ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. ३१ ऑक्टोबरपर्यंत, चित्रपटाने जगभरात २५० कोटींची कमाई केली आहे. रक्षितचा ‘७७७ चार्ली’ जूनमध्ये प्रसिद्ध झाले. या चित्रपटाने जगभरात सुमारे १०३ कोटी रुपयांची कमाई केली. हे दोन्ही चित्रपट आजवरच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांच्या यादीत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kantara actor rishabh shetty and colleague rakshit shetty used to sale their movie tickets to public avn