कन्नड चित्रपट ‘कांतारा’ची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. आधी कन्नड आणि नंतर हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. चित्रपटामुळे कर्नाटक सरकारनेही ‘दैव नर्तकांना’ विशेष भत्ता देण्याचं जाहीर केलं आहे. दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टीचंही खूप कौतूक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अशा दिग्गजांनी या चित्रपटाचं कौतूक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता कमाईच्या बाबतीतही ‘कांतारा’ सगळ्यांपेक्षा वरचढ ठरत आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार ‘कांतारा’ने २०० कोटीचा आकडा पार केल्याचं स्पष्ट झालं आहे. खासकरून कर्नाटकात या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद हा अप्रतिम आहे आणि ‘केजीफ’च्या दोन्ही भागांना या चित्रपटाने मागे टाकत एक वेगळा रेकॉर्ड रचला आहे.

आणखी वाचा : पुढच्या वर्षी प्रभासची टक्कर होणार ‘या’ सुपरस्टारशी; ‘आदिपुरुष’च्या अडचणीत पडली आणखी भर

ट्रेड एक्स्पर्टनुसार २४ ऑक्टोबरपर्यंत या चित्रपटाने २११.५ कोटी इतकी कमाई केली आहे. यापैकी १९६.९५ कोटी हे या चित्रपटाने भारतातच कमावले आहेत. एवढंच नव्हे तर ‘कांतारा’ हा सर्वात जास्त बघितल्या गेलेला कन्नड चित्रपट ठरला आहे. यावर्षी सुपरहीट ठरलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’, ‘भूलभुलैया २’, ‘विक्रम’ या चित्रपटांच्या मंदियाळीत आता ‘कांतारा’सुद्धा आला आहे.

या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ३० सप्टेंबरला प्रदर्शित होऊन अजूनही चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटविश्वातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.