कन्नड अभिनेता चेतन कुमारला वेगळ्या ओळखीची गरज नाही. चित्रपट तसेच वादग्रस्त वक्तव्य यासाठी तो कायम चर्चेत असतो. दरम्यान, चेतन कुमारबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार हिंदू धर्माविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी चेतन कुमारला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या ट्विटमध्ये चेतन कुमार यांनी हिंदू धर्माचे अस्तित्व खोटे असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवार, २० मार्च रोजी चेतन कुमारने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हिंदू धर्मासंदर्भात एक वादग्रस्त ट्विट केले आहे. चेतनने आपल्या ट्विटमध्ये हिंदू धर्म हा धादांत खोटं पसरवणारा धर्म असल्याचं त्यांनी यात म्हंटलं आहे. या ट्विटमध्ये चेतन कुमारने लिहिले की, “हिंदुत्व हे संपूर्ण खोटेपणावर आधारित आहे. सावरकर : राम रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले तेव्हा भारतीय राष्ट्राची सुरुवात झाली – खोटं, १९९२ : बाबरी मशीद ही रामजन्मभूमी – एक खोटे, २०२३ उरीगौडा-नांजेगौडा हे टिपूचे मारेकरी – खोटे, हिंदुत्वाचा पराभव सत्याने केला जाऊ शकतो होय- सत्य म्हणजेच समता”.

आणखी वाचा : सलमान खानच्या चाहत्यांवरही मुंबई पोलिसांची बंधनं; धमकीच्या मेलनंतर उचललं ‘हे’ पाऊल

हिंदू धर्माविरुद्धच्या अशा वादग्रस्त शब्दांत ट्वीट केल्याने आता अभिनेत्याला बेंगळुरूच्या शेषाद्रिपुरम पोलिसांनी अटक केली आहे. याआधीसुद्धा चेतन कुमार अशा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आला आहे. त्याने ‘कांतारा’ या चित्रपटातील ‘भूत कोला’ या परंपरेबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. एका हिंदू संघटनेने चेतनच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

चेतनने ‘कांतारा’चा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांच्या विधानावर एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावर तो म्हणाला होता, “भूत कोला ही परंपरा हिंदू धर्माचा भाग नाही. हिंदू धर्माच्या अस्तित्वात येण्यापूर्वी ती प्रथा सुरु होती. त्यामुळे ज्याप्रमाणे हिंदू भाषा ही कोणावर लादता येत नाही. त्याचप्रमाणे हिंदुत्वही कोणावर लादता येत नाही. भूत कोला ही देशातील मूळ रहिवाशांची परंपरा आहे. ती हिंदू धर्मात येणार नाही.” आता या नव्या वादग्रस्त ट्वीटप्रकरणी चेतन कुमार अहिंसावर नेमकी काय कारवाई होते ते लवकरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kantara fame actor chetan kumar arrested for controversial tweet about hindu religion avn