सुपरस्टार रजनीकांतपासून महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत कित्येकांची पडद्यावर दिसणारी नावं ही खरी नावं नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे. पडद्यावर एक नाव आणि कागदावर एक नाव ही फार जुनी संकल्पना आहे, हा त्या सेलिब्रिटी लोकांचा विश्वास आहे. आता या मांदियाळीत ‘कांतारा’स्टार रिषभ शेट्टीचीसुद्धा वर्णी लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिषभ शेट्टीचं रिषभ हे नाव त्याचं खरं नाव नाही. त्याने चित्रपटासाठी केवळ हे नाव बदलून घेतलेलं आहे. नुकतंच ‘द बॉम्बे जर्नी’ या युट्यूबवरील टॉक शोमध्ये रिषभने हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये रिषभने त्याच्या मुंबईच्या आठवणी ताज्या केल्या तसेच बॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दलसुद्धा खुलासा केला. याबरोबरच रिषभ हे त्याचं बदलेलं नाव असल्याचाही त्याने खुलासा केला.

आणखी वाचा : चाहत्यांनी दिलेली अनमोल भेटवस्तू पाहून मुक्ता बर्वे भावूक; फोटो शेअर करत म्हणाली, “प्रत्येक फॅन तुम्हाला…”

रिषभचं नेमकं मूळ नाव काय आणि त्याने ते का बदललं यावबद्दल रिषभने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. रिषभचं खरं नाव प्रशांत शेट्टी आहे. या नावामागची कहाणी सांगताना रिषभ म्हणाला, “मी प्रशांत शेट्टी या नावाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवायचा प्रयत्न करत होतो. पण मला काम मिळत नव्हतं. शेवटी इंडस्ट्रीतल्या कित्येक दिग्गज लोकांची उदाहरणं समोर होती, त्यांनीदेखील चित्रपटात काम करण्यासाठी नाव बदललं होतं. त्यामुळे त्यांना फॉलो करत केवळ नशीब आजमावण्यासाठी मी माझं नाव बदललं आणि रिषभ शेट्टी ठेवलं.”

रिषभच्या ‘कांतारा’ चित्रपटाने देशातच नाही तर जगभरात नाव कामावलं आहे. नुकताच या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ३०० कोटीचा आकडा गाठला आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ नंतर ‘कांतारा’ कन्नड चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून समोर आला आहे. या चित्रपटाने मोठमोठ्या हिंदी चित्रपटनिर्मात्यांची झोप उडवली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kantara star rishabh shetty changed his real name for this reason actor clarifies avn