Grammy Awards 2025: संगीत विश्वातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्वरांची उधळण झाली आणि रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा पाहायला मिळाला. दरवर्षी प्रमाणे यंदाचही लॉस एंजेलिसमध्ये ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या भव्य सोहळ्यात काही कलाकार पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते, तर काहींनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांना आश्चर्य चकीत केलं. तसंच काही सेलिब्रिटींनी आपल्या अनोख्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यापैकी एक म्हणजे कान्ये वेस्टची ( Kanye West ) पत्नी बियांका सेंसरी ( Bianca Censori ). बियांका ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर थेट नग्न झाली. तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉडेलिंगच्या दुनियेत बियांका सेंसरी हे खूप मोठं नाव आहे. पती आणि अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टसह ती ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ सोहळ्याला पोहोचली होती. याच वेळी बियांकाने आपल्या नग्न लूकने सगळ्यांना हैराण करून टाकलं.

‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील कान्ये वेस्ट आणि बियांका सेंसरीचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये बियांका कान्येबरोबर रेड कार्पेटवर वॉक करत पापाराझींसमोर येते. यावेळी तिने काळ्या रंगाचं लॉन्ग जॅकेट घातलेलं पाहायला मिळत आहे. पण, जशी बियांका पोज द्यायला तयार होते तसं ती काळ्या रंगाचं जॅकेट उतरवते आणि नग्न लूकमध्ये पोज देते. यावेळी तिने ट्रान्सपरंट कपडे घातलेले दिसत आहेत. पण, बियांकाचा हा लूक पाहून सर्वजण थक्क झाले.

बियांकाच्या या लूकमुळे तिला आणि कान्ये वेस्टला ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्यात येऊ दिलं नाही, असं म्हटलं जात आहे. सुरक्षा रक्षकाने बियांका आणि कान्येला रेड कार्पेटवरूनच बाहेरचा रस्ता दाखवला. ‘टेलीचक्कर’च्या माहितीनुसार, कान्ये आणि बियांकाला ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ सोहळ्याचं आमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना एन्ट्री दिली गेली नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन मॉडेल बियांकाने २०२२मध्ये रॅपर कान्ये वेस्टबरोबर लग्न केलं होते. ३० वर्षांची बियांका बोल्ड लूकमुळे अनेकांदा चर्चेत आली आहे.