मागच्या आठवड्यामध्ये ‘द कपिल शर्मा शो’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. कपिल शर्माचा हा शो सध्या खूप चर्चेत आहे. नव्या पर्वानुसार कार्यक्रमामध्ये थोडेफार बदल केले गेले आहेत. तसेच शोमध्ये काही नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे. कृष्णा अभिषेक, भारती सिंह अशा जुन्या कलाकारांनी शो सोडल्यामुळे नव्या पर्वाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती. कपिल शर्मा शो नेहमीच टीआरपीच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर असतो.

कपिल शर्मा शोच्या नव्या पर्वामध्ये आतापर्यंत अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंह, तमन्ना भाटिया, हुमा कुरेशी, मधुर भांडारकर, सोहम शहा असे सेलिब्रिटी उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रमाच्या एका भागामध्ये राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंना आमंत्रित केले होते. नुकताच या शोच्या नव्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सैफ अली खान, राधिका आपटे, शरीब हाश्मी, रोहित सराफ असे काही कलाकार दिसत आहेत. या कलाकारांसह पुष्कर-गायत्री या दिग्दर्शक जोडीनेही कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती लावली आहे.

नव्या भागाच्या प्रोमोमध्ये कपिल सैफ अली खानशी गप्पा मारत त्याची मस्करी करताना दिसत आहे. त्याने सैफला त्याच्या चित्रपटांचा संदर्भ देत एक गमतीदार प्रश्न विचारला. कपिल हसत म्हणाला की, “तुम्ही ‘भूत पुलिस’ चित्रपटामध्ये भूत पकडत होतात. ‘बंटी और बबली’मध्ये तुम्हाला खोट्या बंटी-बबलीला पकडायचे होते. आता या चित्रपटात तुम्ही हृतिकला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहात. तुमच्या फार्महाऊसवर असलेल्या कोंबड्या तुम्ही स्वत: पकडता की, त्यासाठी वेगळे लोक आहेत ??” या अजबगजब प्रश्नाचे उत्तर देताना सैफनेही हसत “त्यासाठी मी फार्महाऊसवर एक कोंबडा ठेवला आहे”, असे सांगितले.

आणखी वाचा – गौरीला अजिबात आवडत नाही शाहरुखची ‘ही’ सवय; म्हणाली, “त्याच्या या सवयीमुळे पार्टी…”

‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader