मणिरत्नम यांचा ‘पोन्नियन सेल्वन पार्ट-1’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलिकडेच या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. या एपिसोडच्या टीझरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर आगामी एपिसोड धमाल आणि विनोदांनी भरलेला असणार आहे हे दिसून येतं.

सोनी टीव्हीने यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये कपिल PS-1 च्या टीमला मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहे. तो विक्रमला विचारतो की, तुम्ही या शोमध्ये याल असे कधी वाटले होते का? कपिलच्या या प्रश्नाचं उत्तर विक्रमही त्याच्याच स्टाईलमध्ये देतो, ज्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक हसायला लागतात.

आणखी वाचा- ऐश्वर्या राय-बच्चननंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, दिग्दर्शकांनीही मानले आभार

या व्हिडीओमध्ये कपिल विक्रमला विचारताना दिसतो की, “तुम्ही नुकतंच ट्विटर जॉईन केलं आहे ना.” ज्यावर चियान विक्रम होय असे उत्तर देतो. यानंतर कपिल त्याला सांगतो, “व्हिस्कीनंतर ट्विटर रिस्क होते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.” कपिलच्या या विनोदावर सर्वच हसू लागतात. काही वर्षांपूर्वी कपिलने एक ट्वीट केलं होतं जे प्रचंड गाजलं होतं आणि नंतर त्याने आपण हे ट्वीट नशेत असताना केल्याचं म्हणत स्पष्टीकरण दिलं होतं. याचा उल्लेख विनोदी पद्धतीने यावेळी कपिलने केला.

आणखी वाचा- ‘पोन्नियन सेल्वन’शी ऐश्वर्याच्या लेकीचं खास कनेक्शन, मणिरत्नम यांनी आराध्यावर सोपवली होती ‘ही’ जबाबदारी

दरम्यान PS-1 हा मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून तयार होत आहे. यामध्ये विक्रम व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवी आणि त्रिशा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची स्पर्धा हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’शी होणार आहे.

Story img Loader