‘विकेंड का वार..शनिवार..’, असे म्हणत येत्या शनिवारी सलमान खान ऐवजी ‘कॉमेडी किंग कपिल शर्मा’ टेलिव्हिनवरील बहुचर्चित ‘बिग बॉग-८’ या ‘रिआलिटी गेम शो’मध्ये दिसणार आहे. कलर्स वाहिनीवर रात्री ९ वाजता सुरू होणाऱया या कार्यक्रमाचे येत्या शनिवारचे सुत्रसंचलन कपिल शर्मा शर्मा कुटुंबिय करणार आहेत. म्हणजेच, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ कार्यक्रमातील दादी, गुत्थी आणि पलक यांच्यासोबत कपिल शर्मा ‘बिग बॉस-८’ कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हाताळणार आहे.
दबंग खान सलमानचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे त्याला सेलिब्रेशन करण्यासाठी कुटुंबिय आणि मित्रपरिवाराला वेळ देता यावा यासाठी ‘बिग बॉस’ने सलमानला शनिवारी आराम दिला आहे. त्यानंतर रविवारपासून सलमान परत ‘बिग बॉस’ची सुत्रे हाती घेईल.
विशेष म्हणजे, ‘बिग बॉस’ कार्यक्रमानंतर पुढचा कार्यक्रम कपिल शर्माच्याच कॉमेडी नाईट्सचा असतो. त्यामुळे शनिवारी रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत लागोपाठ दोन तास कपिल शर्माच कलर्स वाहिनीचा ‘बिग बॉस’ ठरेल. दरम्यान, शनिवारी सलमान खान सुत्रसंचालक नसल्याने ‘बिग बॉस’ची ‘व्होटआऊट’ प्रक्रिया एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून रविवारी सलमानच्या उपस्थितीत ‘व्होटआऊट’ घेण्यात येणार आहे. 

Story img Loader