दिग्दर्शक अब्बास मस्तान यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी कॉमेडीचा बादशाह कपील शर्मा आणि ‘बिग बॉस’ फेम एली अवराम यांना करारबद्ध केल्याचे समजते.
यशराज फिल्मच्या बँक चोर चित्रपटातून कपील शर्मा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची अटकळ होती परंतु, काही कारणास्तव या चित्रपटासाठी कपील ऐवजी रितेश देशमुखला यशराज फिल्म्सकडून पसंती देण्यात आल्याची चर्चा असतानाच आता कपील शर्मा दिग्दर्शक अब्बास मस्तान यांच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एण्ट्री घेणार आहे. कपील सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचेही समजते.
विशेष म्हणजे, या चित्रपसाठी कपीलसोबत सुप्रसिद्ध रिआलिटी शो ‘बिग बॉस ७’ मधील स्पर्धक एली अवराम हीची अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. एलीने ‘बिग बॉस ७’ मध्ये आपली चांगलीच ओळख मिळवली होती. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपील’ या बहुचर्चित ‘कॉमेडी शो’च्या माध्यमातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा कपील शर्मा या चित्रपटात ग्रीकस्विडीश अभिनेत्री एली सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच ग्रीक आणि स्विडीश या दोहोंचा ताळमेळ असल्यामुळे मुद्दामच एलीची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये एक आगळावेगळा कॉमेडीपट घेऊन येण्याचा अब्बास मस्तान यांचा मानस आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma and elli avram signed for abbas mustans next