प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कपिल शर्मा लवकरच त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’चा दुसरा सीजन भेटीला आणणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. फॅन्सची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणारेय. कपिल शर्माने त्याच्या आगामी ‘द कपिल शर्मा शो’ची घोषणा केलीय. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने स्वतः त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केलीय. त्यामूळे पुन्हा टीव्हीसमोर बसून विनोदांचा आनंद लुटण्यासाठी तयार व्हा.

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने त्याच्या ‘द कपिल शर्मा’ शो च्या पुढच्या सीजनमधील स्टारकास्टसह एक फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या फोटोमध्ये ‘द कपिल शर्मा’ शो मधील जुनीच स्टारकास्ट दिसून येतेय. या फोटोंना शेअर करत कपिलने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “जुन्या चेहऱ्यांसोबत नवी सुरूवात…”

‘द कपिल शर्मा शो’च्या पुढच्या सीजनची घोषणा करताना कपिलने स्टारकास्टसोबतचे तीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कपिलसोबत भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुदेश लहरी हे सगळे कलाकार दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कृष्णाने यापूर्वीच दिली होती हिंट

कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने यापूर्वीच द कपिल शर्मा शोमध्ये परणार असल्याची हिंट दिली होती. कृष्णाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. यात भारती सिंह आणि कीकू शरदा हे दोघे दिसून येत होते. हे फोटोज शेअर करत कृष्णाने लिहिलं होतं, “लवकरच पुन्हा भेटीला येतोय….आमची पहिली क्रिएटीव्ह टीमची मिटींग…खूपच उत्साहित आहे…नवा माल लवकरच भेटीला येतोय…” त्याची ही स्टोरी पाहून तो पुन्हा ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये एन्ट्री करणार याचा अंदाज सर्वांनी बांधला होताच.

 

करोना परिस्थितीमुळे बंद केला होता शो

यापूर्वीच कपिलने ‘द कपिल शर्मा’ शो च्या नव्या सीजनची घोषणा केली होती. नव्या सीजनसाठी तो लेखक आणि इतर कलाकारांच्या शोधात होता. गेल्या फेब्रूवारी मध्येच तो पुन्हा एकदा पिता बनलाय. पत्नी गिन्नीला वेळ देता यावा यासाठी कपिलने आधीचा शो बंद केला होता, असं बोललं जात होतं. याच दरम्यान वाढत्या करोना परिस्थितीमुळे त्याच्या शोमध्ये जास्त पाहूणे देखील येत नव्हते. या सर्व कारणांमुळे शो च्या मेकर्सनी हा शो काही कालावधीसाठी ऑफ एअर करण्याचा निर्णय घेतला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलने हा शो पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्याचे फॅन्स आनंदीत झाले आहेत. तसंच त्याच्या फोटोवर कमेंट्स करत आपली उत्सुकता देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत. पण हा नवा शो कधीपासून ऑन एअर होणार, याबाबात मात्र अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.