विनोदवीर कपिल शर्मा याने अभिनेत्रीसोबत केलेल्या गैरवर्तवणूकीच्या आरोपाचे खंडन केले आहे. कपिलने मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकतेच कपिलला पेटा या संस्थेतर्फे ‘पर्सन ऑफ दि ईयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वृत्तानुसार इफ्फी पुरस्कार सोहळ्याच्या समालोचन पार्टीत कपिलचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने दिपालीशी गैरवर्तन केले. मात्र, आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे कपिलने खंडन केले आहे. तो म्हणाला की, हा आरोप निराधार आहेत. मी तर तिथे उपस्थितचं नव्हतो. माझ्याविरुद्ध अशा अफवा पसरविणारे कोण लोक आहेत हे मलाही माहित नाही.
इंडिया टाइम्सच्या माहितीनुसार, सदर पार्टीत कपिल इतर मुलींशीदेखील सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. तो क्षण फार लाजीरवाणा होता. त्यानंतर त्याने दिपालीसोबत नृत्य करण्याचा प्रयत्न केला. पण दिपालीला त्याची वागणूक न आवडल्याने ती लांब झाली. मग अभिनेता शरद केळकरने कपिलला एका बाजूला बसवले आणि तो योग्य वागत नसल्याची समजूत त्याला दिली. दरम्यान, याबाबत स्वतः दिपालीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma denies misbehaving with marathi actress deepali sayyad