बॉलीवूडमध्ये ‘किस किसको प्यार करू’ या चित्रपटाने पदार्पण करणा-या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ फेम कपिल शर्माला चक्क ऐश्वर्या रायच्या व्हॉनिटीमधून हकलण्याचा प्रकार घडला आहे.

तर झाले असे की, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या सेटवर लवकरचं विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन झळकणार आहे. आगामी ‘जजबा’ या चित्रपटाची प्रसिद्धी ती या शोमध्ये करणार आहे. तिच्या आगमनानिमित्त ‘कॉमेडी नाइट्स..’ चा खास प्रोमो तयार करण्यात आलेला आहे. या प्रोमोत कपिल ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये येण्यासाठी तिची परवानगी घेतो. आत येताच तो तिला म्हणतो की, माझ्या आयुष्यात आज मी दोन गोष्टी पहिल्यांदाच बघतोय, एक तर तुम्हाला आणि दुसरं काजू बदाम. त्यानंतर ऐश्वर्याचे बॉडीगार्ड येऊन कपिलला बाहेर काढतात.

येत्या रविवारी ४ ऑक्टोबरला ऐश्वर्या राय ‘कॉमेडी नाइट्स..’ मध्ये दिसेल.

Story img Loader