सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा’ हा सर्वाधिक चर्चिला जाणारा शो आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणून त्याकडे पाहिलं जातं. शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’च्या मंचावर अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. काही दिवसापूर्वीच ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या टीम आली होती. यावेळी कपिल करिना कपूर खानसोबत फ्लर्ट करताना दिसून आला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी आता सैफने मजेशीर अंदाजात कपिलची कान उघडणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गुड न्यूज’ चित्रपटानंतर अलिकडेच ‘जवानी जानेमन ‘या चित्रपटाच्या टीमने ‘द कपिल शर्मा’च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी सैफदेखील उपस्थित होता. शो सुरु असतानाच सैफला’ गूड न्युज’च्या प्रमोशनमध्ये कपिलने करिनासोबत केलेलं वर्तन आठवलं आणि त्यावरुन त्याने कपिलची चांगलीच खिल्ली उडविली.

“मागच्या वेळी माझी पत्नी करिना या शोमध्ये आली होती. त्यावेळी तू तिची प्रचंड मस्करी करत होतास”, असं सैफ कपिलला म्हणाला. सैफने प्रश्न विचारल्यानंतर कपिलनेही हजरजबाबीपणे, “तुमचीच कशाला कोणाचीही पत्नी असली तरी मी अशीच मस्करी करतो”, असं उत्तर दिलं.

वाचा : ‘सीएए म्हणजे काळा कायदा’; उर्मिला मातोंडकरांची केंद्र सरकारवर टीका

दरम्यान, ‘जवानी जानेमन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये आलिया फर्निचरवालाने सैफसोबत स्क्रिन शेअर केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून तो पहिल्याच दिवशी ४ ते ५ कोटींची कमाई करु शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma flirt with kareena kapoor on the kapil sharma show saif ali khan scold him ssj