बॉलिवूडमध्ये सध्या सुरु असलेल्या बॉयकॉट ट्रेंडमुळे सगळेच हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणावर कॉमेडियन कपिल शर्माची प्रतिक्रियाही समोर आली आहे. नुकताच कपिल बेटी फॅशन शोमध्ये सहभागी झाला. त्यावेळी कपिलला बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारले असता त्याने हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने टाळण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा : अभिनेत्री सारा अली खान दिसणार देशभक्तीपर चित्रपटात, साकारणार ‘ही’ भूमिका

बॉयकॉट ट्रेंडवर कॉमेडियन कपिल शर्मा प्रतिक्रिया देतेना म्हणाला, “कृपया मला ट्विटरच्या जगापासून दूर ठेवा. असे ट्रेंड येतच राहतात. मला या सर्व गोष्टींमध्ये ओढू नका. मी मोठ्या मुश्किलीने ट्विटरच्या दुनियेतून बाहेर पडलो. आता मला यापासून दूर राहू द्या. त्यामुळे ट्विटरवर काय चालले आहे ते मला माहित नाही.” कपिलने बॉयकॉटबद्दल सांगितले की हा ट्रेंड तात्पुरता आहे, काही काळापुरता तो मर्यादित असेल. तसेच हे सगळे सांगत असताना त्याला याबाबतीतील माहिती नाही असेही तो म्हणाला.

कपिलला अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाबद्दल विचारले असताही त्याने अशीच उडवाउडवीची उत्तरे देत त्यावर बोलणं टाळलं. अक्षय कुमार हा कपिल शर्माचा जवळचा मित्र आहे, जेव्हा ‘पिंकविला’च्या रिपोर्टरने त्याला रक्षाबंधन या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबद्दल विचारले तेव्हा कपिल म्हणाला, “मी अक्षयच्या कोणत्याही चित्रपटावर बहिष्कार टाकल्याचे ऐकले नाही. कृपया मला ट्विटरपासून दूर ठेवा. मला यात ओढू नाका.”

हेही वाचा : कपिल शर्माशी वाद की कमी मानधन? कृष्णा अभिषेकने शो सोडण्याचं काय आहे नेमकं कारण

दरम्यान, कॉमेडीयन कपिल शर्माचा लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा आहे.

Story img Loader