कॉमेडीचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या कपिल शर्माचे असंख्य चाहते आहे. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरतोच शिवाय टीआरपीमध्येही नेहमीच पुढे राहतो. कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘आय एम नॉट डन येट’ या शोमध्ये दिसणार आहे, ज्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने येताच खळबळ उडवून दिली आहे. यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे कपिल शर्माची पत्नी, गिन्नी चतरथ, जी मीडियापासून दूर राहते, ती देखील या शोमध्ये कॉमेडी किंगसोबत दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये असे दिसून आले की कपिलने गिनीला त्याच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारला, ज्याला गिन्नीने असे उत्तर दिले की कॉमेडी किंगची बोलतीच बंद झाली. तसेच आजूबाजूच्या लोकांनाही आपले हसू आवरता आले नाही. पत्नी गिन्नीबद्दल बोलताना कपिल शर्मा म्हणाला, “पपांनी मला माझ्या आणि बहिणीच्या लग्नाबद्दल सांगितले होते. पण मी लग्न कुणासोबत करायचं हे मला माहीत होतं. ती माझी पत्नी गिन्नी होती. पण गिन्नी, तू एका स्कूटरवाल्याशी लग्न करण्याचा का निर्णय घेतला?” त्याला प्रत्युत्तर देताना गिन्नी म्हणाली, “मला वाटले की, पैसा असणाऱ्या लोकांवर तर सगळेच प्रेम करतात, म्हणून मी या गरीबाचं भलं करण्याच विचार केला.”

Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
Krish Jagarlamudi married to Hyderabad doctor
Video: प्रसिद्ध दिग्दर्शकाने ४६ व्या वर्षी गुपचूप उरकलं दुसरं लग्न; डॉक्टरशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आला समोर
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी

दरम्यान, एक काळ असा होता की कपिल शर्माने गिन्नी चतरथच्या प्रेमाला नकार देण्याचे ठरवले होते. ‘द मॅन मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माने त्याची आणि गिन्नी चतरथची प्रेमकहाणी शेअर केली होती. तो म्हणाला, “गिन्नी माझी ज्युनियर होती. मग काही दिवसांनी कळले की तिला मी आवडतो. मी तिला समजावले की तू ज्या गाडीतून कॉलेजला येतेस, त्या गाडीची किंमत माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या कमाई आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र राहणे शक्य नाही.”

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्नबंधनात अडकले. गिन्नी आणि कपिलला अनायरा शर्मा आणि त्रिशान शर्मा अशी दोन मुले आहेत.