बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने १८ वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो सुरू केला होता. यामध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटींना आमंत्रित करून त्यांच्याशी गप्पा मारतो. हा शो नेहमीच वादग्रस्त कारणांनी किंवा सेलिब्रेटींनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत केलेले खुलासे यामुळे चर्चेत राहिला आहे. सध्या या शोचा सातवा सीझन सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये सर्वांची खिल्ली उडवणाऱ्या आणि सेलिब्रेटींची गुपितं सर्वांसमोर आणणाऱ्या करण जोहरवर कॉमेडियन कपिल शर्मा भारी पडला होता. एका कार्यक्रमात कपिलने करण आणि त्याच्या शोची थट्टा केली होती.

करण जोहर आणि कपिल शर्माचा हा किस्सा २०१७ सालचा आहे. यावेळी दोघांनी फिल्मफेअर अवॉर्डचं सुत्रसंचालन केलं होतं. मात्र, स्टेजवर सुरुवातीला फक्त कपिल शर्माच दिसत होता. नंतर करण जोहर तिथे येतो आणि म्हणतो, “मी एवढा वेळ वाट पाहत होतो की तू मला बोलवशील.” यावर कपिल म्हणतो, “तुम्ही वाटच तर पाहत नाही सर. एक शो संपतो, दुसऱ्या शोमध्ये तुम्ही परीक्षक म्हणून काम करता. ते संपल्यावर तुम्ही तिसर्‍या शोमध्ये परीक्षक बनता.”
आणखी वाचा- प्रियांका चोप्रा ठरतेय ‘टिपिकल इंडियन मॉम’? लेकीला नजर लागू नये म्हणून करते ‘हे’ काम

कपिल शर्मा करणला काही बोलू न देताच आपलं बोलणं पुढे सुरूच ठेवतो. तो म्हणतो, “एवढंच नाही तर एक कॉफी शॉपदेखील सुरू करून ठेवलं आहे. त्यानंतरही तुम्हाला वेळ मिळाला तर त्यात एखादा चित्रपट तयार करता आणि त्या चित्रपटाच्या मदतीने ते प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये येता.” हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात पण करण जोहरचा चेहरा मात्र पडलेला दिसतो.

आणखी वाचा- “अनिल कपूर यांना आजोबा हाक दिलेली आवडणार नाही कारण…” करण जोहरने केला खुलासा

दरम्यान मे २०२२ मध्ये करणने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या नव्या पर्वाची घोषणा केली. त्याची सुरुवातही ७ जुलैपासून झाली. पहिल्या एपिसोडमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे कलाकार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसले होते. याशिवाय, सारा अली खान, जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, अक्षय कुमार, सामंथा रुथ प्रभू, अर्जुन कपूर, सोनम कपूर, करीना कपूर खान, आमिर खान, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल या कलाकारांनी या शोमध्ये आतापर्यंत हजेरी लावली आहे.

Story img Loader