विनोदाचा बादशहा कपिल शर्मा लवकरच एका नव्या शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच छोट्या पडद्यावर तो पुनरागमन करणार आहे. काही दिवसांपूर्वी या शोचो पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. पण या प्रोमोमधून शोचे नाव सांगण्यात आले नव्हते. पण नुकतेच कपिलने फेसबुकवर लाइव्ह चॅट केले. या चॅटमध्येच त्याने शोच्या नावाचा खुलासा केला.

लाइव्ह चॅटमध्ये कपिलने शोचे नाव फॅमिली विथ कपिल शर्मा असे असल्याचे सांगितले. यावेळच्या शोमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या शहरांमधील लोक प्रेक्षक म्हणून या शोमध्ये सहभागी होऊ शकतील. फेसबुक चॅटदरम्यान कपिलने हेही स्पष्ट केले की, सध्या तरी हे नाव निश्चित करण्यात आले आहे. पण भविष्यात शोचे नाव बदलूही शकते.

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला की, मी ऐकलं होतं की प्रसिद्ध असण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. आता मला कळलं आहे की कोणत्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत. सतत काम करत राहणं महत्त्वाचं. अनेकांकडे ऐकवायला फक्त चांगल्याच गोष्टी असतात असे नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ- उतार हा असतोच. फक्त कलाकारांचा वाईट काळ लोकांसमोर येतो हाच काय तो फरक.

त्याच्या नवीन शोचो प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. प्रोमोमध्ये कपिल त्याच जुन्या अंदाजात कॉमेडी करताना दिसत आहे. प्रोमोत एक रिक्षावाला कपिलला सोनी चॅनलच्या ऑफिसमध्ये घेऊन जाण्यास मनाई करतो. त्याचा नकार ऐकून कपिल त्याला ‘बाबा जी का ठुल्लू’ दाखवतो.
कपिल तिसऱ्यांदा त्याचा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आधीच्या दोन शोपेक्षा हा शो थोडा वेगळा असेल असे म्हटले जात आहे. पहिल्यांदाच कपिलच्या नव्या शोच्या प्रोमोमध्ये त्याचे इतर सहकारी दिसले नाही. प्रोमोत तो एकटाच दिसला. त्यामुळे या नवीन शोमध्ये त्याचे जुने सह-कलाकार असणार की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Story img Loader