‘द कपिल शर्मा शो’ हा विनोदी कार्यक्रम आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडचे सेलिब्रिटी येऊन आपल्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे प्रमोशन करतात. मात्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या आरोपांमुळे कपिल शर्मा शो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मा आणि त्यांच्या शोच्या निर्मात्यांवर खळबळजनक आरोप केले होते. ज्यावर आता कपिल शर्मानं स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळून लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका युजरनं आपल्या ट्वीटमध्ये कपिल शर्माला टॅग करताना लिहिलं, ‘द काश्मीर फाइल्स प्रमोट करण्यास कपिल का घाबरला कपिल? कशाची भीती वाटली जे विवेक रंजन अग्निहोत्री आणि त्यांच्या स्टारकास्टला तुम्ही तुमच्या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलावलं नाही. मी तुमचा खूप मोठा चाहता होतो. पण तुम्ही तर मला आणि करोडो लोकांना निराश केलं आहे. मी तुम्हाला बॉयकॉट करत आहे.’

आणखी वाचा- फरहान अख्तरशी का केलं लग्न? शिबानी दांडेकरनं सांगितलं खरं कारण

युजरच्या या ट्वीटला उत्तर देताना कपिलनं विवेक अग्निहोत्रींनी लावलेल्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानं लिहिलं, ‘हे सत्य नाही आहे राठोड साहेब. तुम्ही विचारलं त्यासाठी सांगतोय. बाकी ज्या लोकांनी या सर्व गोष्टी सत्य मानल्या आहेत त्यांना स्पष्टीकरण देण्यात काहीच अर्थ नाही. एक अनुभवी सोशल मीडिया युजर असल्यानं मी तुम्हाला सांगतो, आजकाल सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या एकतर्फी कथांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.’

आणखी वाचा- ‘झुंड’ चित्रपटावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला, “नागराज मंजुळे तुम्हाला…”

काय होते विवेक अग्निहोत्री यांचे आरोप?
एका युजरने ट्विटरवर विवेक यांना टॅग करत विचारलं होतं, “विवेक सर, कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करणे आवश्यक आहे. तुम्ही सर्वाना सहकार्य केले आहे. कृपया या चित्रपटाचंही प्रमोशन करा. आम्हाला मिथुन दा, अनुपम खेर यांना एकत्र बघायचे आहे. धन्यवाद!’

युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘द कपिल शर्मा शोमध्ये कोणाला आमंत्रित करावे हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. जोपर्यंत बॉलीवूडचा संबंध आहे, एकदा मिस्टर बच्चन गांधी कुटुंबासाठी म्हणाले होते – ‘वो राजा हैं हम रंक’

यापूर्वी विवेक अग्निहोत्रीने एका ट्विटमध्ये सांगितले होते की, तो स्वत: कपिल शर्माच्या शोचा मोठा चाहता आहे पण त्याला या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यांनी लिहिले की, मी देखील त्यांचा चाहता आहे, पण वस्तूस्थिती अशी आहे की आमच्या चित्रपटात एकही मोठा स्टार नसल्याने त्यांनी आम्हाला त्यांच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. बॉलीवूडमधील मोठे सेलिब्रेटी किंवा कलाकार यांच्याव्यतिरिक्त इतर लेखक, चांगले अभिनेते यांना कोणी विचारत नाही. विवेकच्या या आरोपांनंतर अनेक युजर्सनी कपिल शर्माला ट्रोल केले.

आणखी वाचा- ‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणतात “तो नेहमीच अति…”

दरम्यान विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून त्याला खूप पसंती मिळाली आहे. या चित्रपटात ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या याबद्दल सांगण्यात आले आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, अनुपम खेर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma reaction on the kashmir files controversy and vivek agnihotri statement mrj