असहिष्णुता हा केवळ समाज माध्यमे आणि रिकामटेकड्या लोकांमुळे लोकप्रिय झालेला शब्द आहे, असे मत सुप्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा याने व्यक्त केले. असहिष्णुता हा केवळ एक शब्द आहे. यापूर्वी तुम्ही कधीही हा शब्द ऐकला होता का?, केवळ समाज माध्यमे आणि काही रिकामटेकड्यामुळे सध्या हा शब्द लोकप्रिय झाला. आमच्या शोमध्ये थट्टा-मस्करी करताना ‘बाबाजी का ठुल्लू’ हा शब्द वापरण्यात आला आणि तो लोकप्रिय झाला. असहिष्णुतेसंदर्भातही नेमका हाच प्रकार घडला आहे. आता तर हा शब्द उच्चारला तरी लोक हसण्यावारी नेतात, अशा शब्दांत कपिलने असहिष्णुतेवरून सुरू असलेल्या वादाची खिल्ली उडविली. लोकांनी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही. चांगल्या प्रकारच्या विनोदासाठी समाजात मोकळीक असली पाहिजे. भारतात विनोद करताना विचार करून काम करावं लागतं. कोण कुठल्या गोष्टीवरून दुखावलं जाईल सांगता येत नाही. इतकचं काय, एखाद्या विनोदामुळे तुरूंगातही जावे लागते, असे कपिलने ‘आयएएनएस’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा