‘द कपिल शर्मा’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटात्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात. यावेळी तापसी तिच्या ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आली होती. तापसीने अक्षयला तिच्या चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा खुलासा कपिलने केला आहे.

‘द कपिल शर्मा’चा हा प्रोमो सोनी टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रोमोमध्ये कपिल बोलतो की, “तापसीने सगळ्यात आधी अक्षय कुमारसोबत ‘बेबी’ चित्रपट केला आणि चित्रपटात ‘शबाना’ नावाची भूमिका साकारली. यानंतर तिने ‘नाम शबाना’ या नावावर चित्रपट केला आणि अक्षय कुमारला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर तिने अक्षयसोबत ‘मिशन मंगल’ या चित्रपटात काम केले, ज्यामध्ये त्यांनी रॉकेट बनवले आणि नंतर तिने स्वतः ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट केला आणि अक्षय कुमारला पुन्हा आणि आता…”

आणखी वाचा : “जरा दोन दिवस…”, ऋतुराजच्या सामन्या आधी नेटकऱ्यांनी सायलीला दिला सल्ला

हे ऐकताच तापसी हसते आणि बोलते “तुला काढणार नाही.” यावर हसत कपिल अर्चना पूरन सिंहकडे पाहतो आणि बोलतो “मी तर त्यांच्याविषयी बोलतोय.” तर अर्चना हे ऐकून हसू लागतात. कपिल आणि तापसीमध्ये सुरु असलेली ही जुगलबंदी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘द कपिल शर्मा शो’चा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : मुनमुन दत्ताने सांगितला लैंगिक शोषणाचा भयानक अनुभव, म्हणाली ‘ शाळेतील शिक्षक आणि चुलत भाऊ…’

दरम्यान, तापसीचा ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केले आहे. या चित्रपटात तापसीने रश्मी नावाच्या एका खेळाडूची भूमिका साकारत आहे. ही खेळाडू एका छोट्या गावातून आलेली असते. ती मेहनत करत खेळाडू बनते, परंतु लिंग चाचणीत अपयशी ठरल्यानंतर तिला निलंबित करण्यात येते.

Story img Loader