‘कॉमेडी नाइटस् विथ कपिल’ हा शो सेलिब्रिटींसाठी प्रमोशनचा आवडता मंच झाला आहे. यावेळी प्रसिद्ध पंजाबी रॅपर हनी सिंग ‘कॉमेडी नाइटस्…’मध्ये पाहायला मिळणार आहे. आज (मंगळवार) शोच्या चित्रीकरणाच्या काही मिनिटे आधी कपिलने हनी सिंगबरोबरचे आपले छायाचित्र टि्वटरवर प्रसिद्ध केले. शोमध्ये आलेला हनी सिंगदेखील खूष होता. टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात हनी सिंग म्हणतो, तो नुसता कॉमेडियन नाहीये आणि मी नुसता गायक नाहीये. आम्ही महान आहोत एलओएल. आम्हाला एन्टरटेनर्स आणि योयो म्हणा.

‘कॉमेडी नाइटस् विथ कपिल’ हा चित्रपटकर्त्यांसाठी चित्रपटांच्या प्रसिद्धीचा आवडता मंच झाला आहे. या शोमध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान आणि माधुरी दीक्षितसारख्या दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. परंतु, सप्टेंबर महिन्यापासून हा शो बंद होत असल्या कारणाने ‘कॉमेडी नाइटस्…’च्या मंचावर येणारा हनी सिंग हा शेवटचा सेलिब्रिटी ठरणार आहे.
नवीन व्यक्तिरेखा आणि नवीन सेटसह आम्ही पुन्हा येऊ… तोपर्यंत… हसत राहा, असा संदेश अलिकडेच कपिल शर्माने टि्वटरवर पोस्ट केला होता.

Story img Loader