प्रत्येक आठवड्याला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’चे दोन शो आणि लवकरच सुरू होणारे चित्रपटाचे शुटिंग यामुळे प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा अतिशय व्यस्त जीवनशैली जगतो आहे. कामाचे अनियमित तास आणि वेळापत्रकातील अनिश्चितता याचा कपिलच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. कपिलला पदार्पणातील चित्रपटातच वजन कमी करावयाचे असल्याने कपिलने आहारतज्ज्ञाची नेमणूक केली आहे. प्रत्येक चित्रीकरणाच्या ठिकाणी हा आहारतज्ज्ञ कपिलबरोबर असतो. कपिल काम करत असलेल्या चित्रपटाचे शुटिंग पुढील महिन्यात सुरू होणार आहे. या विषयी कपिल म्हणतो, माझ्या कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. जेव्हा शक्य होते, तेव्हा मी झोप आणि जेवणावर शब्दश: धावा बोलतो. परंतु, आता मी प्रकृतीला प्रथम प्राधान्य द्यायचं ठरवल आहे. माझ्या आहारावर लक्ष ठेवण्यासाठी मी एका तज्ज्ञाची नियुक्ती केली आहे. त्रास असा आहे की, रात्रीच्या जेवणासाठी तो मला फक्त उकडलेल्या भाज्या खायला देतो. परंतु मी जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला फसवून ब्रेड आणि ऑमलेट खातो. त्यामुळे मला जेव्हढे वजन कमी करायला हवे आहे तेव्हढे मी करत नाहीये. मागे कपिलला पाठीच्या त्रासाने ग्रासले होते, परंतु पाठीसाठीच्या नियमित व्यामाने त्याचा हा त्रास दूर झाला. परंतु, आता त्याला खांद्याचा त्रास जाणवत आहे. चॅनलनेदेखील टीआरपी कमी होण्याच्या भितीने वेळेत कमतरता करण्यास मनाई केली आहे. परंतु, सुदैवाने कपिल काम करत असलेल्या ‘बँक चोर’ चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलवरून पुढे ढकलून मे महिन्यात करण्यात आले आहे. मिळालेल्या संधीचा फायदा घेत कपिल वेळेशी स्पर्धा करत ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो’चे काही भाग अगोदरच तयार करून ठेवत आहे, जेणेकरून ‘बॅंक चोर’ चित्रपटाचे एक सत्र तो कुठल्याही अडथळ्याशिवाय पार पाडू शकेल. स्वत:साठीदेखील वेळ नसल्याचे कपिलने म्हणले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma to shed weight for debut movie bank chor