कलर्स वाहिनीवरील ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा सुप्रसिद्ध कॉमेडी शो बंद होण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पण खुद्द कपिलने त्यास दुजोरा दिल्याने आता हा कार्यक्रम बंद होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  जानेवारी २०१६ पासून कॉमेडी नाईट्स बंद होणार असल्याचा निर्णय कपिल शर्माने जाहीर केला आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शो ने तीन वर्षातच लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. पण कलर्स वाहिनीने आता ‘कॉमेडी नाईट्स’ कार्यक्रमाशी मिळताजुळता कार्यक्रम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कपिल शर्मा नाराज असल्याचे समजते. वाहिनीच्या भूमिकेवर नाराज असलेल्या कपिलने ‘कॉमेडी नाईट्स’विषयी इतर वाहिन्यांशीही चर्चा सुरू केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्याच्या कलर्स वाहिनीच्या भूमिकेवर चाहते देखील नाराजी व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharmas comedy nights with kapil to end in january