माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. शोरगुल या आगामी चित्रपटासाठी कपिल सिब्बल यांनी गीत लेखन केले आहे. सिब्बल यांनी या चित्रपटासाठी ‘तू ही तू’ ही कव्वाली लिहीली असून सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग या कव्वालीला आवाज देणार आहे.
सुप्रसिद्ध झितारवादक निलाद्रीकुमार यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. निलाद्रीकुमार यांच्याच आग्रहाखातर सिब्बल यांनी आणखी एका चित्रपटासाठी ‘तेरे बिना’ हे गाणे लिहीले आहे. हा चित्रपट सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणार आहे.
तेरे बिना हे गाणे नक्कीच सर्वांना आवडेल असा विश्वास कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. निलाद्रीकुमार यांच्यासोबत या गाण्यावर जवळपास नऊ महिने काम केल्याचे सिब्बल सांगतात. याशिवाय, केवळ एका विनंतीवर अरिजीत याने हे गाणे गाण्यास त्वरित होकार कळविल्याबद्दल देखील सिब्बल यांनी आभार व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा