आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान आणि ऋृषी कपूर अशी दमदार स्टार कास्ट असलेल्या ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा पोस्टर आकर्षक असून, संपूर्ण स्टार कास्टने लक्ष वेधून घेतले आहे. ऋृषी कपूर यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यानंतर करण जोहरने चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला. चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान धम्माल करत असल्याचे दिसते. वेगवेगळ्या प्रॉप्सचा वापर केल्यामुळे पोस्टर अधिकच खुलून दिसते. ऋृषी कपूर यांचा वाढदिवस सर्वजण मोठ्या जल्लोषात साजरा करत असल्याचे या पोस्टरमधून दिसून येते.

दरम्यान, शकून बत्रा दिग्दर्शित ‘कपूर आणि सन्स’ हा चित्रपट 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी आशा आहे. चित्रपटात फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ऋृषी कपूर यांच्या नातवाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader