सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या बहुचर्चिच ‘कपूर अँण्ड सन्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या कौटुंबिक नाट्य, भावना, प्रेम दृश्यांची झलक पाहता हा चित्रपट परिपूर्ण मनोरंजन पॅकेज ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आणि आलिया यांच्याबरोबर फवाद खान आणि ऋषी कपूर यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. ऋृषी कपूर या चित्रपटात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ आणि फवाद हे सख्खे भाऊ दाखविण्यात आले असून, दोघांच्या आयुष्यात आलियाचा प्रवेश होईपर्यंत दोघांमधील नाते अगदी चांगले असते. मात्र, आलिया आयुष्यात आल्यानंतर दोघे भाऊ दुरावतात आणि त्यानंतर निर्माण होणारे पेचप्रसंग, याचे भावनिक दर्शन चित्रपटातून होणार आहे. प्रेम भावनांना हाताळताना जवळच्या नात्यांमध्ये कसा दुरावा निर्माण होतो, यास स्पर्श करणारे कथानक याशिवाय तसेच रचना पाठक शहा यांनी साकारलेली आईची भूमिकाही लक्ष वेधून घेणारी आहे.

Story img Loader