शाहरुख खान आणि गौरीने त्यांच्या सरोगेट मुलाच्या जन्माची बातमी मंगळवारी माध्यमांना दिली असून त्याचे ‘अब्राम’ असे नामकरण करण्यात आले आहे. शाहरुखचा जवळचा मित्र, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याने ट्विटरद्वारे सर्वप्रथम अब्रामचे स्वागत केले आहे. करण जोहर आणि शाहरुख यांच्या जोडीने ‘माय नेम इज खान’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारखे हिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. अभिषेक बच्चन, शोभा डे यांनीही अब्रामचे स्वागत केले असून शाहरुख-गौरीला त्यांच्या नवीन पाहुण्यासाठी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खानला आर्यन (१६) आणि सुहाना (१३) ही दोन मुले आहेत.

Story img Loader