फिल्ममेकर करण जोहरने त्याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केलीय. करण जोहर लवकरच देशभरात थरकाप उडवणारा नरसंहार जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित नवा चित्रपट तयार करणार आहे. या चित्रपटाची कहाणी वकील सी. शंकरन नायर यांच्यावर आधारित आहे. देशातील सुप्रसिद्ध वकील सी. शंकरन नायर यांनी न्यायालयात लढा देऊन जालियनवाला हत्याकांडातील सत्य समोर आणलं होतं. यासाठी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात जाण्याचं धाडस त्यांनी केलं होतं. फिल्ममेकर करण जोहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केलीय.
करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. ‘The Untold Story of C. Sankaran Nair’ असं या नव्या चित्रपटाचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना करणने लिहिलं, “The Untold Story of C. Sankaran Nair चित्रपटाला बनवण्यासाठी आणि एका ऐतिहासिक व्यक्तीच्या कहाणीला रूपेरी पडद्यावर उतरवण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
View this post on Instagram
करण जोहरचा हा नवा चित्रपट वास्तविक घटनांनी प्रेरित असणारा आहे. तसंच सी. शंकरन नायर यांचे पणतू रघु पलट आणि त्यांची पत्नी पुष्पा पलट यांनी लिहिलेल्या ‘The Case That Shook the Empire’ या पुस्तकाच्या आधारे हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंह त्यागी करणार असून लवकरच यावर काम सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चित्रपटातील कलाकारांच्या नावांची घोषणा लवकरच करणार असल्याचं करण जोहरने सांगितलंय.
करण जोहरचे आणखी बरेच चित्रपट तयार असून केवळ रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘ब्रहमास्त्र’ आणि ‘लायगर’ या चित्रपटांचा देखील यात समावेश आहे. ‘सुर्यवंशी’ चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ हे दोघे लीडमध्ये झळकणार आहेत. हा चित्रपट गेल्याच वर्षी रिलीज करण्यात येणार होता. मात्र, करोना परिस्थितीमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अभिषेक बच्चन हे तिघे लीडमध्ये असणार आहेत. हा चित्रपट सुद्धा गेल्याच वर्षी रिलीज होणार होता. मात्र हा चित्रपट सुद्धा रिलीजसाठी पुढे ढकलण्यात आला.
करण जोहरच्या ‘लायगर’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटातून साउथ इंडियन स्टार विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. विजय यांच्यासोबत या चित्रपटात अनन्या पांडे सुद्धा लीड रोलमध्ये दिसून येणार आहे.