बॉलिवूड निर्माता करण जोहर सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सातव्या पर्वामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडबद्दलच्या गॉसिप्समुळे हा शो सतत चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या भागामध्ये खास ज्यूरींना आमंत्रित केलेआहे. तन्मय भट्ट, कुशा कपिला, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे करणच्या या ज्यूरींनी या फिनाले शोमध्ये हजेरी लावली.
या व्हिडीओमध्ये हे चौघे ज्यूरी मेंबर्स मजामस्ती करताना दिसत आहेत. कार्यक्रमाच्या धाटणीनुसार करण आलेल्या पाहुण्यांना प्रश्न विचारत असतो. पण या भागामध्ये समोर बसलेले पाहुणे त्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत. याच भागात करणने कित्येक गोष्टींचा उलगडा केला आहे. या प्रोमोमधून करणच्या या शोचं वेगळंच स्वरूप पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रीकडून हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा पहिला रिव्ह्यू; चित्रपटाचं कौतुक करत म्हणाली…
करण जोहरला बॉलिवूड स्टार्स त्यांच्या लग्नात बोलवत नाही यावरून ज्यूरींनी त्याला विचारणा केली तर त्यावर करणने धमाल उत्तर दिलं आहे. याविषयावर करणने प्रथमच उघडपणे भाष्य केलं. करण म्हणाला, “जेव्हा विकी आणि कतरिना यांच्या लग्नाची बातमी समोर आली. पण त्या लग्नात मला आमंत्रण दिलेलं नव्हतं आणि तेव्हा मलाच खूप लज्जास्पद वाटत होतं. लग्नानंतर त्यांनी मेसेज पाठवला पण लोकांनी मला प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं, तुमच्यात काही बिनसलं आहे का? मग त्यांनी तुम्हाला लग्नाला का नाही बोलावलं वगैरे वगैरे. जेव्हा मला समजलं की अनुराग कश्यपला आणि आणखीन काही लोकांनाही आमंत्रण मिळालेलं नाही तेव्हा कुठे मला हायसं वाटलं.”
कॉफी विथ करणच्या सातव्या पर्वातला या एपिसोडचा टीझर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि प्रेक्षक करणच्या या प्रश्नांची उत्तरं ऐकायला उत्सुक आहेत. येत्या गुरुवारी म्हणजेच २९ तारखेला हा एपिसोड डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.