काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र पार्ट १ : शिवा’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटामध्ये रणबीर कपूरसह आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांनी काम केले आहे. तरीही काही मिनिटांचा कॅमिओ करणारा शाहरुख खान या चित्रपटाचा खास फॅक्टर ठरला आहे. प्रदर्शनापूर्वी सुरु झालेली बायकॉटची चळवळ या चित्रपटाने थांबवण्यात यश मिळवले आहे.

तीन चित्रपटांची मालिका असलेल्या ब्रह्मास्त्रचे आणखी दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांची कथा ‘अस्त्रवर्स’ या काल्पनिक विश्वावर आधारलेली आहे. सध्या ब्रह्मास्त्र पार्ट १ : शिवा पाहणाऱ्या प्रत्येकाला देव या पात्राची भूमिका कोण साकारणार आहे हा प्रश्न पडला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्माता करण जोहरने एक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ देव या पात्राचा आहे असे मानून नेटीझन्सनी हे पात्र कोणता अभिनेता साकारु शकतो या विषयावर मत मांडायला सुरुवात केली होती. या यादीमध्ये शाहरुख खान, हृतिक रोशन आणि रणवीर सिंग यांच्या नावाचा समावेश होता.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

दरम्यान खुद्द करण जोहरनेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तो सध्या दुबईमध्ये आहे. तेथे आयोजित केलेल्या लाईव्ह मुलाखतीमध्ये त्याला एका चाहत्याने ‘अस्रवर्समधला देव कोण आहे’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर करण ‘तुम्हाला आधीच माहीत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ’ असे म्हणाला. त्याशिवाय चित्रपट समिक्षिका अनुपमा चोप्रा यांनीही नकळतपणे रणवीर सिंग ब्रह्मास्त्र २ मध्ये देव साकारणार असल्याची ग्वाही दिली. एका व्हिडीओमध्ये त्यांनी “मला आशा आहे की, पहिल्या भागामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करत ते (अयान मुखर्जी व निर्माते) रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत ब्रह्मास्त्रचा दुसरा भाग आणखी भव्य बनवतील.” असे म्हणत खरी माहिती दिली आहे.

आणखी वाचा – ‘ब्रम्हांश’च्या गुरुचा पत्ता गुगल मॅपवर कसा काय? नेटकऱ्याच्या प्रश्नाला करण जोहरने दिलं उत्तर

ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागाच्या शेवटी दीपिका पदुकोणच्या अमृता या पात्राची ओळख करुन देण्यात आली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचे पात्र जल अस्त्राशी जोडलेले आहे.

Story img Loader