बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याच्या मेंदूवर रविवारी हिंदुजा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या मेंदूत दोन महिन्यांपासून असलेली गाठ काढण्यात आली आहे. हृतिकची प्रकृती उत्तम असून त्याला दोन-तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. मात्र, डॉक्टरांनी त्याला चार आठवडे आराम करण्याचा सल्ला दिल्याचे राकेश रोशन यांनी सांगितले.
दरम्यान, आज (सोमवारी) चित्रपटसृष्टीतील व्यक्ती हृतिकला रुग्णालयात जाऊन भेटले. यांमध्ये शाहरुखची पत्नी गौरी खान, करण जोहर, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि करण मल्होत्रा, उदय चोप्रा, संजय कपूर आणि त्याची पत्नी माहीप, मधुर भांडारकर, शर्मन जोशी यांचा समावेश आहे.
दोन महिन्यांपूर्वी ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी हृतिकच्या डोक्याला आघात झाला होता. तेव्हापासून तो डोकेदुखीच्या त्रासाने त्रस्त होता. मात्र या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यातून बरे झाल्यावर हृतिक पुन्हा ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशी रवाना होणार आहे.

Story img Loader