दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करण जोहरने आता पर्यंत अनेक रोमॅंटिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. करणचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत. मात्र, करणच्या एका मैत्रिणीने करणला लग्नासाठी ३ वेळा मागणी घातली होती. ही अभिनेत्री दिसरी- तिसरी कोणी नाही करणची खास मैत्रिण नेहा धुपिया आहे. नेहाने करणला लग्नासाठी ३ वेळा मागणी घातली असली तरी करणने तिन्हीवेळा तिला नकार दिला होता. याचा खुलासा नेहाने एका मुलाखतीत केला आहे.

नेहाच्या ‘नो फिल्टर विथ नेहा’ या टॉकशो मध्ये करणने हजेरी लावली होती. त्यावेळी नेहाने हा खुलासा केला. “मी विनोद म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी करणसमोर तीनवेळा लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि प्रत्येक वेळी त्याने मला नकार दिला. मी आता पर्यंत त्या एकट्याच पुरुषाला लग्नासाठी विचारले. त्याने मला नकार दिल्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याला माझ्या शरीराच्या कोणत्याही पार्टमध्ये इंट्रेस्ट नाही,” असे नेहा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

दरम्यान, या आधी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करणच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. वाढदिवसाच्या “हार्दिक शुभेच्छा करण, असाच न थांबता मोठा हो..माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”, अशा आशयाचे कॅप्शन तिने त्या पोस्टला दिले होते.

आणखी वाचा : “मी मुलांना जन्म देणारी मशीन नाही…”, प्रेग्नेंसीच्या ‘त्या’ प्रश्नावर विद्या बालनचं धक्कादायक उत्तर

करण जोहरने अजून लग्न केलेले नाही. मात्र, एका शोमध्ये त्याने सांगितले होते की त्याने जर लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती. त्यात त्याने करीना कपूरशी लग्न केले असते. एवढंच नाही तर करणने त्याचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सांगितले होते की अभिनेत्री अनुष्का शर्मा ही त्याची क्रश होती.

Story img Loader