बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर हा तीन खान मंडळींना चित्रपटात समलैंगिक व्यक्तिरेखेत दाखवण्याच्या तयारीत आहे. शाहरुख, सलमान, आमीर नक्कीच मोठ्या पडद्यावर समलैंगिक भूमिका साकारण्यासाठी तयार होतील, असे वक्तव्य करण जोहरने केले.
समलैंगिक प्राध्यापकाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘अलिगढ’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला करण जोहरने उपस्थितीकर लावली होती. त्यावेळी बॉलीवूडमधील आमीर, सलमान आणि शाहरुख हे तीन खान रुपेरी पडद्यावर अशी समलैंगिक भूमिका साकारतील का, असा प्रश्न त्याला करण्यात आला. त्यावर करण म्हणाला की, जर चित्रपटाची कथा चांगली असेल आणि विषयाची मांडणी चांगल्या पद्धतीने केली तर तिनही खान नक्कीच अशी भूमिका साकारतील.
करणने याआधी ‘दोस्ताना’, ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये समलैंगिकता हा विषय हाताळलेला आहे.
शाहरूख, आमीर, सलमान समलैंगिक भूमिका नक्कीच साकारतील- करण जोहर
करण जोहर हा तिनही खान मंडळींना समलैंगिक भूमिकेत दाखविण्याच्या तयारीत आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 01-02-2016 at 11:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar hopes shahrukh salman aamir will be okay doing a film like aligarh