शिल्पा शेट्टी रविवारी नेहमी तिच्या खाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. अभिनेत्री नेहमीच कडक डाएट फॉलो करतात त्यात गोड, साखर असे पदार्थ वर्ज्य असतात असं म्हटलं जातं. पण शिल्पा मात्र दर रविवारी अशा पदार्थांवर ताव मारतानाच दिसते. त्यामुळे एवढे गोडाचे पदार्थ खाऊनही ती एवढी फीट कशी असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. गेल्या रविवारी शिल्पा आणि आलियाने मिळून आयफा सोहळ्यावेळी गोड पदार्थांचा मनमुराद आनंद घेतला होता. तर या रविवारी ती करण जोहरच्या घरी गेली होती. यावेळी ती एकटीच नव्हती तर श्रीदेवी, मनिष मल्होत्रा हेदेखील करणच्या घरी खानपानाला आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिलीप कुमार यांच्या नातीचा ‘शेप ऑफ यू’ तुम्ही पाहिलंत का?

शमीता शेट्टीने हा व्हिडिओ शूट केला आहे. ज्यात करण त्याच्या घरी आज खास पाहुणे आल्याचं सांगत, शिल्पा, श्रीदेवी आणि मनिषकडे बोट दाखवतो. यावेळी शिल्पा म्हणाली की, ‘मी आता सगळ्या कलाकारांच्या आईसोबत आहे. तुम्हीही मॉम हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा.’ यावेळी शिल्पाच्या बाजूला श्रीदेवी बसली होती. ती म्हणाली की, ‘सध्या करण माझ्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या आड येत आहे.’ तिच्या या वक्तव्यामुळे घरात एकच कल्ला झाला. श्रीदेवीने करणची उडवलेली ही खिल्ली पाहून ती सगळ्या कलाकारांची आई का आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले, असे शिल्पा म्हणाली.

श्रीदेवीच्या या वक्तव्यामुळे करण त्यांच्यापासून लांबच उभा राहिला आणि जेव्हा शमिताने त्याच्याकडे व्हिडिओ नेला तेव्हा तो दचकला.
सध्या शिल्पा तिच्या इतर व्यावसायिक कामात व्यस्त आहे. तर श्रीदेवीचा संपूर्ण दिवस मॉम या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यात जातो. तर करणही धर्मा प्रोडक्शनच्या इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित