करण जोहर अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने पुनहा एकदा कॅमे-याला सामोरे जाणार असून त्यामुळे आपण अस्वस्थ असल्याचे करणने ट्विट केले आहे. यापूर्वी करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या चित्रपटात तो एका उद्योगपतीची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी त्याने केवळ रु.११ मानधन घेतले आहे. तसेच, चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने १० किलो वजन कमी केल्याचे दिग्दर्शक अनुराग कश्यपने सांगितले. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या रणबीरसोबत करण जोहर चित्रिकरणासाठी कोलंबोला पोहचला आहे.
दरम्यान, सोफी चौधरी, ‘डी-डे’ दिग्दर्शक निखिल अडवाणी, तुषार कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी ट्विटद्वारे करणला प्रोत्साहन दिले आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपट पुढील वर्षी डिसेंबरला जगभर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader