अभिनेत्री आलिया भट्ट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘कलंक’चं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या वरूण धवनचा ‘कलंक’ मधला पहिला लूक दिग्दर्शक करण जोहरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘कलंक’चं पहिलं पोस्टर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात अधिक कुतूहल निर्माण करत आहे.
‘कलंक’मध्ये वरुण धवन जफरच्या भूमिकेत आहे. अत्यंत निर्भय आणि नेहमीच संकटाची दोन हात करायला तयार असणारा जफर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. करणनं एक दिवस आधी ‘कलंक’मधला एक फोटो शेअर केला होता. या चित्रपटाचं स्वप्न आपण जवळपास १५ वर्षांपूर्वी पाहिल्याचं त्यानं म्हटलं.
Presenting @Varun_dvn as Zafar! He flirts with life and danger! #MenOfKalank #Kalank
@duttsanjay #AdityaRoyKapur @aliaa08 @sonakshisinha @MadhuriDixit @abhivarman #SajidNadiadwala @apoorvamehta18 @foxstarhindi @DharmaMovies @NGEMovies pic.twitter.com/FakpffMi9Z— Karan Johar (@karanjohar) March 7, 2019
‘हा एक असा चित्रपट आहे, ज्यावर मी सर्वस्व झोकून काम केलं आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. असं स्वप्न ज्यावर त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काम केलं आहे. हे स्वप्न मी तेव्हा पूर्ण करु शकलो नाही. पण, त्या स्वप्नाला एक दिशा मात्र नक्की मिळाली आहे….’, असं लिहित करणनं या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहे.
‘कलंक’मध्ये अनेक बडे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. १९४० च्या दशकातलं कथानक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांच्या भूमिकेवरून लवकरच पडदा उठणार आहे.