बॉलिवूडचे नावाजलेले दिग्दर्शक करण जोहर आणि रामगोपाल वर्मा यांच्यात पुन्हा एकदा ट्विट युध्द पेटले आहे. सध्या दोघे एकमेकांना ट्विटरच्या माध्यमातून कोपरखळ्या मारण्यामध्ये व्यस्त आहे.
रामगोपाल वर्माने ‘स्टुडंटस् ऑफ द इयर’ या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाची खिल्ली उडवत ट्विटयुध्द छेडले होते. करण जोहरच्या ‘स्टुडंटस् ऑफ द इयर’ पासून कुणीतरी ‘टिचर्स ऑफ द इयर’ची निर्मिती केल्यास त्यातून ‘डिजॅस्टर ऑफ द इयर'(वर्षातील सर्वात मोठी आपत्ती) निर्मिण होईल. असे ट्विट केले होते.
रामगोपाल वर्माच्या ट्विटला उत्तर देत करणने पलटवार केला. त्यामध्ये “रामू वर्षातील सर्वात मोठी आपत्ती तर तुझ्या मूलखामध्ये आहे. तु निर्माण केलेल्या तुझ्या अशास्वत मूलखाला आता पर्यंत कोणालाही शास्वत बनवता आले नाही.”, असे म्हटले आहे.
करणच्या ट्विटरला लगेचच उत्तर देणार नाही तो रामू कसला. “अरे करण मी तूझ्या चित्रपटाची प्रशंसा केली होती”, या आशयाचा कोपरखळी रामगोपाल वर्माने ट्विट केली.
या दोन दिग्दर्शकांमधील शाब्दिक चकमक काही नवीन नाही. रामगोपाल वर्माने करण जोहरच्या ‘कभी खुषी कभी गम’ चित्रपटाची खिल्ली उडवत “मी आता पर्यंत पाहिलेला सर्वात भयानक चित्रपट”, असे म्हटले होते. करणने देखील रामगोपाल वर्माच्या या टिकेचा खरपूस समाचार घेतला होता. मात्र, गेल्या वर्षी दोघांमध्ये शांतता करार झाला होता. रामगोपाल वर्माने करणला त्याच्या ‘द अटॅक ऑफ २६/११’ चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रण दिले होते.
आता पुन्हा दोघांमध्ये शांतता निर्माण होण्याची अपेक्षा करूयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा