बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता करण जोहर याच वर्षी सरोगसीच्या माध्यमातून बाबा झाला. यश आणि रुही या जुळ्या मुलांचा तो आता बाबा आहे. काही दिवसांपूर्वीच करणने आपल्या जुळ्या मुलांचा पहिला फोटो शेअर केलेला. त्यानंतर त्याने मंगळवारी यश, रुहीचा आणखी एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : करणने काजोलसाठी लिहिला माफीनामा

यशची जुळे मुले वेळेच्या आधीच जन्मल्यामुळे त्यांना जवळपास एक महिना नीओनेटल इंटेन्सिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आलेले. त्याच्या मुलांचा जन्म सातव्या महिन्यातच झालेला. याविषयी करण म्हणालेला की, ‘माझ्या मुलांचा जन्म दोन महिने आधीच झाल्याने त्यांचे वजन फारच कमी होते. कोणत्याही वडिलांप्रमाणे साहजिकच मलाही माझ्या मुलांची काळजी होती. मी खूप चिंताग्रस्त होतो. त्यावेळी मला त्यांना जवळ घेऊन त्यांचे रक्षण करायचे होते. पण त्यांना तेव्हा एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना बघून माझ्यात काळजात चर्रss होत होते. पण सक्षम डॉक्टरांची टीम माझ्या बाळांची काळजी घेत होती.’

वाचा : देवा, पावसाच्या तडाख्यापासून मुंबईला वाचव; कलाकारांचं गणरायाला साकडं

करणने वडील होण्याच्या अनुभवाबद्दल म्हटलेले की, ‘वयाच्या ४४ व्या वर्षी हे माझे सर्वात मोठे ब्लॉकबस्टर आहे. या नव्या बदलाबद्दल मला अजूनही कळलेलं नाही. ते दोघं केवळ दोन महिन्यांचे आहेत. ते खात असो किंवा झोपलेले असू दे, नाहीतर रडत असले तरी मी त्यांना न्याहाळत बसतो. पण, ते केवळ माझे आहेत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या जन्मामुळे एका नव्या ऊर्जेने माझ्या वैयक्तिक आयुष्यातील एकटेपणा दूर केला आहे. त्यांच्याकडे बघताना माझ्या डोळ्यात पाणी तरळते.’