बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान आणि सीमा खान यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांनी बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. या पार्टीमुळे करण जोहरला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. नुकतंच यावर करणने स्पष्टीकरण दिले आहे.

करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. ही फोटो शेअर करतेवेळी करण म्हणाला, “मी, माझे कुटुंब आणि घरी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची RTPCR चाचणी केली आहे. देवाच्या कृपेने आम्हा सर्वांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मी दोनदा माझी करोना चाचणी केली आहे आणि दोन्हीही वेळेस मी निगेटिव्ह आलो आहे.”

“मी मुंबई महापालिकेने घेतलेल्या सर्व प्रयत्नांचे आणि शहर सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वांचेच मनापासून कौतुक करतो. त्यांना माझा सलाम. दरम्यान मी माझ्या काही मीडियाच्या सदस्यांना स्पष्टीकरण देऊ इच्छितो की ८ लोकांच्या एकत्रित येण्याला पार्टी म्हणत नाही. माझ्या घरात कोव्हिडचे सर्व प्रोटोकॉल पाळले जातात. त्यामुळे ते निश्चितच करोनाचे हॉटस्पॉट असू शकत नाही. आम्ही सर्व जबाबदार लोक आहोत. आम्ही प्रत्येकवेळी मास्क घालतो. कोणीही करोना महामारीला हलक्यात घेतलेले नाही. त्यामुळे मी प्रसारमाध्यामांच्या काही सदस्यांना थोडा संयम ठेवण्याचे आवाहन करतो. त्यांनी तथ्य नसलेले वृत्त देणे टाळावे, अशी विनंतीही करतो,” असे करण जोहर म्हणाला.

नुकतच करण जोहरच्या घरी ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक पार्टी आयोजित करण्यात आला होता. या पार्टीला करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खानसह इतर सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीतूनच सेलिब्रिटींमध्ये करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

रणवीरने विमानतळावरच केले दीपिकाला किस, व्हिडीओ व्हायरल

दरमयान या पार्टीनंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करण जोहर राहत असलेल्या इमारतीत आणि परिसरात करोना संसर्ग चाचणी आणि स्क्रिनिंग सुरू केली आहे. तसेच हा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे.

Story img Loader