बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आला आहे. खुद्द करण जोहरच्या हस्ते या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या पुतळ्याजवळ जेव्हा करण उभा राहिला तेव्हा पुतळा कोण आणि खरा करण कोण हे क्षणभर लक्षात येत नव्हते इतका हुबेहुब पुतळा साकारण्यात आला आहे. करण जोहर बॉलिवूडमधील पहिला दिग्दर्शक आहे ज्याचा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काळ्या रंगाचा कोट आणि सेल्फी घेतानाच्या पोजमध्ये करणचा हा पुतळा आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी करणची आई देखील उपस्थित होती. करणने पुतळ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांना हा फोटो तुफान आवडला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘मादाम तुसाँ संहालग्रयात माझा मेणाचा पुतळा बनवण्यात यावा हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. तसेच मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होतो. मी ८ वर्षांचा असताना हे संग्रहालय पहायला आलो होते’ असे करण म्हणाला.

करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये भव्यदिव्य दृश्य आणि डोळे दिपवणारा सेट पाहायला मिळत आहे. तसेच चित्रपटात  आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. करणचा हा चित्रपट १७ एप्रिला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar unveils his wax statue at madame tussauds