निर्माता करण जोहर याने धर्मा प्रोडक्शनच्या मार्फत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टी या विषयावर भाष्य करत तो नेहमी त्याची मतं मांडत असतो. त्याच्या वक्तव्यांमुळे तो बऱ्याचदा चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वळवले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी एक आहे असे तो म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटांच्या तिकिट शुल्कात मिळणार मोठी सवलत, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया निर्णय

करण जोहर आणि एसएस राजामौली यांनी हैदराबाद येथे ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटासाठी एक भव्य प्री-रिलीझ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना करण म्हणाला की, “भारतीय चित्रपटाला बॉलीवूड किंवा टॉलिवूड नव्हे तर भारतीय चित्रपट म्हणून संबोधले पाहिजे. आम्ही एक आहोत, वेगळे नाही.”

पुढे तो म्हणाला, “आम्ही सर्वजण आमच्या चित्रपटांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ही भारतीय चित्रपटसृष्टी आहे. त्याचे तुम्ही विभाजन करू नका. अजूनही आपण त्याला बॉलिवूड, टॉलीवूड अशी नावे देतो. पण आम्ही या विचारांच्या बाहेर असून या भारतीय चित्रपटसृष्टीचा भाग आहोत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापूढे कोणताही चित्रपट बॉलिवूड, टॉलीवूड नसून प्रत्येक चित्रपट आता भारतीय चित्रपट असेल.”

हेही वाचा : “आदित्य चोप्रा, करण जोहर आता मला काम देत नाहीत कारण…” अनुपम खेर यांनी व्यक्त केली खंत

यापूर्वी केजीएफ फेम सुपरस्टार यश यानेही भारतीय चित्रपटांचे विभाजन करू नाका असे सर्वांना आवाहन करत सर्व चित्रपट एक असून ते भारतीय चित्रपटसृष्टीचा भाग असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता करण जोहरनेही हेच सांगितले आहे. करण जोहरच्या या विनंतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून त्याचे बोलणे आता चर्चेचा विषय बनत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar urges audience to not divide indian cinema into bollywood and tollywod rnv