करण जोहर हा बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. तसेच अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती त्याच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. अनेक स्टारकिड्सना चित्रपटांमधून लाँच करणारा करण अविवाहित आहे. त्याने लग्न केलं नसून तो यश आणि रुही या मुलांचा एकल पिता आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा बोलत असतो. त्याला कोणत्या अभिनेत्रीशी लग्न करायचं होतं, याबद्दल करणने नुकताच खुलासा केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राखी सावंत बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी बदलणार धर्म? आदिल स्पष्टच म्हणाला, “माझा मुस्लिम धर्म…”

करणने सेलिब्रिटी स्टायलिस्ट आणि डिझायनर अनिता श्रॉफ अदजानियाच्या चॅट शो ‘फीट अप विथ द स्टार्स’वर त्याच्या डेटिंगबद्दल बातचीत केली. त्यावेळी मला माझ्या पार्टनरबरोबर कम्फर्ट झोन डेव्हलप करायला आवडतं, असं करण म्हणाला. पुढे मुलाखतीत जेव्हा करण जोहरला कोणती अभिनेत्री आवडते, असं विचारण्यात आलं, तेव्हा त्याने क्षणाचाही वेळ न घेता त्याची BFF करीना कपूरचं नाव घेतलं. मला करीनाशी लग्न करायला आवडलं असतं, असं करण म्हणाला. करण जोहर आणि करीना कपूर खान खूप जवळचे मित्र आहेत.

हेही वाचा – चाहत्यांच्या गर्दीत अडकलेल्या रणवीरला थापड नेमकी कुणी मारली? रेड कार्पेटवरचा Video Viral

दरम्यान, मध्यंतरी करीनाने करण जोहरबरोबर त्याची मैत्री तोडली होती. करणने त्याची बायोग्राफी An Unsuitable Boy मध्ये खुलासा केला होता की त्याने करीनाला ‘कल हो ना हो’ चित्रपटात भूमिका ऑफर केली होती, पण तेव्हा तिने खूप जास्त फी मागितली होती. पण इतकी फी देण्यासाठी करण तयार नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता.

हेही वाचा – सायकल पंक्चर झाल्यानं रिक्षातून जावं लागलं घरी; ‘या’ अभिनेत्याला ओळखलंत का?

“माझा प्रॉब्लेम करीनाशी होता. तिने खूप जास्त पैसे मागितले आणि त्यावेळी आमच्यात काही तरी वाद झाला. ‘मुझसे दोस्ती करोगे’च्या रिलीजच्या वेळी मी तिला ‘कल हो ना हो’ मधील एक भूमिका ऑफर केली होती. शाहरुख खानला जी फी मिळत होती तीच फी करीनाने मागितली. मी म्हटलं मला माफ कर, मी इतकी फी देऊ शकत नाही. मात्र, करीनाच्या या वागण्याने मी खूप दुखावलो होतो. करीना आणि मी जवळजवळ एक वर्ष एकमेकांशी बोललो नव्हतो. एक वर्ष आम्ही फक्त एकमेकांना पार्ट्यांमध्ये पाहिलं. खरं तर आम्ही केलेला तो मूर्खपणा होता, ती त्यावेळी खूप लहान होती,” अशी जुनी आठवण करणने सांगितली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar wanted to marry kareena kapoor khan reveals on show hrc