दिग्दर्शक, निर्माता करन जोहर सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह असतो. आपल्या मुलांसोबत मस्ती करतानाचे, मुलांच्या कौतुकाचे व्हिडिओज तो कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या करनने त्याच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. काय आहे ह्या व्हिडिओत?
करन जोहरचा मुलगा यश याचा एक व्हिडिओ करनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अपलोड केला आहे. यात यशने काळ्या रंगाची पँट, काळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि त्याला मॅचिंग असे शूज घातले आहेत. आणि विशेष म्हणजे यशने आपल्या गळ्यात शाहरुख खानसाऱखं लॉकेटही घातलेलं आहे.
शाहरुखने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात ज्याप्रमाणे COOL अशी अक्षरं असलेलं लॉकेट घातलं होतं. तसंच आज यशनेही घातलं आहे. त्यावर करनने शाहरुखला टॅग करून लिहिलं आहे, “भाई, हे तुझ्यासाठी.” हे लॉकेट घालून यश मोठ्याने ओरडतानाही दिसत आहे. “डॅड, आय एम कूल” असं तो करनकडे पाहून म्हणत आहे.
नुकताच करनने त्याची मुलगी रुहीचा यशसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात रुही यशची आई झाली होती आणि यश तिच्या मांडीवर झोपला होता. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते भलतेच खूश झाले होते.
करनने नुकतंच आलिया भटच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घरी एक पार्टी दिली होती. ज्यात दिपिका पादुकोन, रणवीर सिंग, अयान मुखर्जी, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर आणि इतर कलाकारांनीही हजेरी लावली होती.