बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. करण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. बऱ्याचवेळा सोशल मीडियावर करणचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. नुकताच करणचा त्याच्या मुलांसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : “कारशेड आरेतच होणार…”, सुमीत राघवनचा राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा

काही दिवसांपूर्वी आई आणि त्याची दोन्ही मुलं यश आणि रुहीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो आता मुंबईत परत आला असून हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरचा आहे. यावेळी करणला त्याच्या मुलांसोबत पाहून फोटोग्राफर्सने त्यांच्या अवती-भोवती गर्दी केल्याचे दिसते. तर त्याच्या दोन्ही मुलांनी फोटोग्राफर्सला पाहिल्यानंतर नमस्कार केला. करणने मुलांना चांगले संस्कार दिल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे. यासोबतच नेटकऱ्यांना करणचा लूक देखील आवडला.

आणखी वाचा : “टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर ७ जुलैपासून करणचा कॉफी विथ करण हा शो प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरु आहे.

Story img Loader