बिग बॉस १५ मध्ये सध्या करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही कारणाने या दोघांमध्ये वाद होताना दिसतात. यामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले आहेत आणि या दोघांमध्ये पुन्हा सर्व काही ठीक व्हावं अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. पण तेजस्वी आणि करण यांचे चाहते त्यांना एकत्र पाहू इच्छित असले तरीही करण कुंद्राच्या बहिणीला मात्र या दोघांचं नातं अजिबात मान्य नाही. एवढंच नव्हे तर ती तेजस्वीवर नाराज असल्याचं तिनं नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून दिसून येतं.

एका चाहत्यानं करण कुंद्राची बहीण मीनू कुंद्राला एका ट्वीटमध्ये टॅग केलं होतं. या ट्वीटमध्ये या चाहत्यानं मीनूला करण आणि तेजस्वीचं नातं मान्य करण्याची विनंती केली होती. दोघांची जोडी बेस्ट असल्याचंही त्यानं आपल्या ट्वीमध्ये म्हटलं होतं. पण यावर मीनूनं जे उत्तर दिलं त्यावरून तर ती तेजस्वीवर खूपच नाराज असल्याचं दिसून येत आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

मीनूनं करण- तेजस्वीच्या चाहत्याच्या या ट्वीटला रिप्लाय करताना लिहिलं, ‘मी काही तिला खूप आधीपासून ओळखत नाही. जे ती मला आवडेल किंवा नाही. पण ती माझ्या भावासोबत जसं वागते ते मला अजिबात आवडत नाही. मला ते सहन होत नाही. ती करणला दुःखी करते ते मला आवडत नाही. माझ्यासाठी फक्त माझा भाऊ करण महत्त्वाचा आहे.’

दरम्यान करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात बिग बॉसच्या घरात मोठं भांडण झालेलं पाहायला मिळालं. या वेळी करणनं तेजस्वीला ‘तुझा चेहरा पाहा, तुझं सत्य मला समजलं आहे.’ असं म्हटलं होतं. तर तेजस्वीनंही करणला ‘भित्रा आहेस’ असं म्हटलं होतं. केवळ करणच नाही तर घरातील इतर सदस्यांनाही तेजस्वीचं वागणं अनेकदा पटत नाही.

Story img Loader