पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची वयाच्या २८ व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाबच्या मनसा जिल्ह्यात त्यांच्यावर ३० राउंड फायर करण्यात आल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येची जबाबदारी कॅनडामधील गँगस्टर गोल्डी बरारने घेतली आहे. या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. बऱ्याच बॉलिवूड आणि हिंदी टीव्ही कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली. सध्या टीव्ही अभिनेता करण कुंद्राची या प्रकरणावरील प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिद्धू मूसेवाला प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करण कुंद्रानं संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “हे अजिबात चांगलं झालेलं नाही. पण मला सर्वात वाईट गोष्ट ही वाटते की या सर्व गोष्टी भर दिवसा घडतात आणि तेही पंजाबमध्ये. दुःखद हे आहे की एका आई आपल्या मुलाला गमावलं आहे. सिद्धूचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो हृदयद्रावक आहे. पंजाबमध्ये अशा गोष्टी घडतायत. अशाप्रकारे गोळ्या चालवल्या जात आहेत. आपल्या देशात अशी बंदूक देण्याची परवानगी नाही. माफ करा पण हे अफगाणिस्तान नाहीये की तुम्ही भरदिवसा अशाप्रकारे उठून बंदूका घेऊन फिराल.”

याशिवाय करणनं सोशल मीडियावर देखील एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्विटरवर त्याने लिहिलं, “पंजाबमधून खूप वाईट वृत्त समोर आलं आहे. हे अजिबात चांगलं नाही. सिद्धू मूसेवाला हे एक लिजेंड होते. मी दुःखी आहे आणि मला रागही येतोय.” याशिवाय शहनाज गिल, सलमान खान, संजय दत्त, कपिल शर्मा, जास्मिन भसीन, मीका सिंग, सलीम मर्चेंट यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.